• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव तालुक्यातील १० हजार भाविकांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव तालुक्यातील १० हजार भाविकांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन

आमदार मंगेश चव्हाण यांचा सलग ५ व्या वर्षाचा उपक्रम; दोन विशेष रेल्वेंची व्यवस्था

चाळीसगाव (प्रतिनिधी) : वारकरी कुटुंबाचा वारसा असणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती ज्येष्ठांची… वारी पंढरीची” हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परिस्थितीमुळे ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही, अशा भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्थेची सोय करून पंढरीचे दर्शन घडविले जाते. २०१९ मध्ये कोविड काळातील खंड वगळता आतापर्यंत १२ हजारहून अधिक भाविकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पंढरपूरला नेले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे वारकऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून शनिवार, दि. ६ जुलै व दि. ९ जुलै रोजी विशेष रेल्वेने १० जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचतील. विशेष रेल्वे क्रमांक १- शनिवार दिनांक ६ जुलै रोजी, विशेष रेल्वे क्रमांक २- मंगळवार ९ जुलैला सायंकाळी ५ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आ. मंगेश चव्हाण व वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व पालखीचे चाळीसगाव रेल्वेस्टेशनकडे प्रस्थान होईल. रात्री ७ वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशनहून विशेष ट्रेनने वारीला सुरुवात. रविवार दिनांक ७ जुलै, बुधवार व १० जुलै सकाळी ६ वा. पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे विशेष ट्रेनचे आगमन व पायी चालत श्री शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूरकडे प्रस्थान होईल. सकाळी १० ते संध्या. ४ वा. सवडीनुसार चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुख्मिणी दर्शन सायंकाळी ४ वा., श्री शनि महाराज मठ येथे सामूहिक हरिपाठ व आमदार मंगेश चव्हाण यांचा वारकऱ्यांशी संवाद संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

श्री शनि महाराज मठ येथून पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे पायी चालत प्रस्थान व विशेष ट्रेनने परतीचा प्रवास. (७ जुलै व १० जुलै रोजी पंढरपूर येथे चाळीसगाव येथून आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजन, वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूर येथे राहील.

हजारो वारकरी भाविकांना पंढरपूरला नेण्याचे आ.चव्हाण यांचे नियोजन आहे. त्यासाठी पंढरपूर वारी नियोजन समिती, भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या नामघोषात यंदाही पंढरी दुमदुमणार आहे.

पंढरपूर वारीची पालखी २०१९ मध्ये मी पहिल्यांदा खांद्यावर घेतली. २३०० ज्येष्ठ नागरिकांना लक्झरी बसने पंढरपुरात नेले. विठूरायाच्या दर्शनाने ते सुखावले. पांडुरंगांच्या आशीर्वादाने मला विधानसभेचे दर्शन झाले. सामान्य कष्टकरी, वारकऱ्याचा मुलगा आमदार झाला. गेल्या दोन वर्षांपासून विशेष रेल्वेने हजारो भाविकांना पंढरपूर वारी घडवून आणत आहेत.

यावर्षी चाळीसगाव शहर व शहरालगत असणारी गावे यांच्यासाठी १ तसेच इतर उर्वरित ग्रामीण भागातील गावे यांच्यासाठी १ अश्या एकूण दोन विशेष रेल्वेंच्या माध्यमातून १० हजार वारकरी मायबापांना पंढरीचे दर्शन घडविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.


 

 

Tags: ashadhi ekadashichalisgaomla mangesh chvhan
Previous Post

सर्पदंश झालेल्या बालकाला काढले मृत्यूच्या दाढेतून

Next Post

गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साळवे विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साळवे विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साळवे विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon