जळगाव (प्रतिनिधी ) ;- चाळीसगाव तालुक्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे एकाने गळफास घेऊन जीवन संपविले . याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील खेरडे येथील ३६ वर्षीय विनोद इंदल पवार याने राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनलाअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे शरद बिमा गायकवाड वय ३० या तरुणाने घराच्या मागील खोलीतल्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली . याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास मोहन सोनावणे करीत आहे. तिसऱ्या घटनेत यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे सागर भागवत सपकाळे वय ३२ याने राहत्या घरातील पत्र्याच्या शेड ला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.