चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील घाटरोड जवळील कसाई वाड्यात चाळीसगाव शहर पोलिसांनी जवळपास १५ गायी व वासरांसह ५ ते ६ क्विटंल मास पकडले आहे. ही कारवाई पो नि कांतीताल पाटील यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चाळीसगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शहरात पहिल्यादाच जिवंत गायीसह मास पकडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.