जळगाव (प्रतिनिधी ) ;- लग्न झाल्यापासून विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पिंप्राळ्याच्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील माहेर असलेल्या विवाहिता पूनम राहुल बारी वय २५ हिचा विवाह राहुल बारी याच्याशी मे २०१७ रोजी शिरसोली येथे झाला होता . संयुक्त कुटुंब असल्याने सासू मंगलाबाई हिरालाल बारी,जेथ महेंद्र बारी, नांदोई काशिनाथ बुंधे, नणंद ज्योती बुंदे, हे आमच्या घरी येऊन पती राहुल यांना खोटे सांगून पती त्यांचे एकूण मारहाण करीत असे. पती चारित्र्यावर संशय घेत मारहाण आणि धमकी देत असल्याने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला विवाहिता पूनम हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास जितेंद्र राठोड करीत आहे.