अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील शहीद हेमू कलानी रोडवरील हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक दाखवत बियरची बाटली दादागिरी करीत नेली अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदलाल रामचंद्र पाजेवाणी (वय-६५ , रा. दादावाडी समोर अमळनेर ) यांचे अमळनेर शहरात हॉटेल आराम परमिट रूम आहे. २१ ऑक्टोबररोजी सायंकाळी दादू एकनाथ निकुंभ ( रा. पारधीवाडा अमळनेर ) याने नंदलाल पाजेवाणी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत २०० रूपये किंमतीची बियर हिसकावून घेतली घेतली. आणि मी परत येतो दुकान बंद करू नको अशी धमकी देवून तो निघून गेला. नंदलाल पाजेवाणी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दादू निकुंभ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहेत.