भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील नाहटा चौफुलीजवळ ११ जून रोजी दुपारी एकाने चाकूचा धाक दाखवून ६० हजारांची दुचाकी आणि ८ हजार किमतीचा मोबाईल जबरी चोरून नेल्याप्रकरणी एकावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात राहणारे मंगेश भारत बेलखुडे ( वय ३०) हे मजुरी करीत असून ११ जून रोजी दुपारी ११ ते साडे अकरा वाजेच्या सुमारास संशयित विनोद सरदार परदेशी रा. जमडी प्रा. बहाळ ता. चाळीसगाव याने चाकूचा धाक दाखवून मंगेश यांची युनिकोर्न मोटर सायकल क्रमांक एमएच ३४ बीई ०४ ९५ हि ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून पळून गेला . याबाबत मंगेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सफौ सत्तर एम शेख करीत आहे.