अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरात गांधलीपुरा परिसरात गोगादेव छडी मिरवणुकीत २ गटाच्या छड्या एकमेकांसमोर आल्यावर दोन्ही गटात हाणामारी होऊन ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. मात्र अमळनेर पोलिसांनी तात्काळ जमाव नियंत्रणात आणला.
गांधलीपुरा भागात दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. कोणाला काही कळायच्या आत सुनील चिरावंडे याला पोटाला चाकू लागला. राकेश कल्याणे हाताच्या कोपऱ्यालाही वार लागला. तर नरेश कल्याणेच्या डोक्याला काठी लागून जखमी झाले. घटनेचे वृत्त कळताच पोनि दत्तात्रय निकम ,एपीआय रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोउनि नामदेव बोरकर ,पोउनि युवराज बागुल, पोउनि शरद काकळीज हे कॉ गणेश पाटील, सिद्धांत शिसोदे, अमोल पाटील, मिलिंद सोनार, जितेंद्र निकुंभे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के , चरण पाटील , हर्षल पाटील, संजय सोनवणे, नितीन कापडणे, सुनील तेली, संजय बोरसे यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जमाव पांगवला. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. तिन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.