चाळीसगाव — छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी करता गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चाच ऐकण्यात येत होती. मात्र मी आमदार झाल्यानंतर पुतळा उभारणीसाठी असलेल्या अनेक अडचणी दुर केल्यात. सार्वजनिक बांधकाम खात्याची जमीन मिळविली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यासाठी मंत्राालयाच्या प्रत्येक विभागात स्वतः प्रस्ताव घेऊन फिरलो, पाठपुरावा केला. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसृष्टीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चबुतरा काम अंतिम टप्प्यात असून लवकरच चाळीसगाव शहरवासीयांची असलेली प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच पुतळा उभारणी होणार असून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींप्रमाणे मलाही आनंद होत असून चाळीसगावकरांचे शिवछत्रपती पुतळा उभारणी स्वप्न लवकरच साकार होईल. अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे

.चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा व शिवसृष्टीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असुन लवकरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा येथे बसविण्याबाबत आज प्रत्यक्षस्थळावर जाऊन खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी केली या प्रसंगी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाडे,नगर अभियंता विजय पाटील, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील ,नगरसेवक चिरागोद्दीन शेख यांच्यासह आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार उमेश दादा पाटील पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होण्यासाठी वेळोवेळी ठराव करणारे नगराध्यक्षा ,सर्व नगरसेवक तसेच शिवप्रेमी नागरिकांनी, विवीध संघटना खंबीर पाठीशी उभे राहिल्याने गेल्या पाच वर्षात सातत्याने या पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यासह पुतळा उभारणीसाठी हायवे रस्त्याचे डी-नोटीफाईड करण्यासाठी ना. नितिन गडकरी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच अधिकारी यांचे भरीव सहकार्य लाभले. आज या चौकामध्ये पुतळा चबुतरा बांधकाम प्रगतीपथावर असल्याने लवकरच या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा बसवला जाईल.याचा तमाम शिवप्रेमी प्रमाणे मला देखील आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण , ज्येष्ठ विश्वासराव चव्हाण,भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाडे, नगर अभियंता विजय पाटील, इलेक्ट्रिक अभियंता कुणाल महाले, आरोग्य निरीक्षक सचिन निकुंभ, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक चिरागोद्दिन शेख , सरपंच डॉ.महेंद्र राठोड, डॉ. तुषार राठोड, नरेंद्रकाका जैन, रवींद्र आबा राजपुत, माजी सरपंच अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजय वाणी, वसुंधरा फाऊंडेशनचे सचिन पवार ,नगरसेवक गणेश भाऊ महाले, भाजप शहर सरचिटणीस अमोल मानकर , रेल्वे सल्लागर कमिटी सदस्य समाधान पाटील, उद्योजक समकीत छाजेड , अमित सुराणा, बंडू पगार, राजूभाऊ पगार, शरद पाटील कैलास गावडे , अग्गा भाई, किशोर गुंजाळ कल्पेश मालपुरे ,स्वप्नील मोरे, काळू शिंदे , रियाझोद्दीन शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पूर्ण परिसराची पाहणी करुन अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.







