पाचोरा ;- पाचोरा – भडगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल -डिझेल व गॅस दरवाढ विरोधात जाहीर निषेध मोर्चा काढत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील शिवसेना कार्यालयापासुन दुपारी ४ वाजता बैलगाडीवर बसुन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले होते.
मोदी सरकार हाय हाय, दरवाढ तात्काळ रद्द झालीच पाहिजे आदी घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.मोर्चाचे नेतृत्व जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख तथा मुंबई महापालिकेच्या नगरसेविका अंजली नाईक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनिता किशोर पाटील, वैशाली सुर्यवंशी, प्रा. डॉ.अस्मिता पाटील यांनी केले.
शिवसेना कार्यालयापासून निघालेल्या मोर्चा तहसीलदार कार्यालयापर्यंत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी अंजली नाईक यांनी उपस्थिनांना मार्गदर्शन करत केंद्र सरकारच्या असंवेदनशील कारभारावर टीका करत ही आंदोलनाची केवळ सुरुवात आहे दरवाढ तात्काळ रद्द न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा दिला तर उपजिल्हाप्रमुख सुनीता पाटील यांनो आपल्या मनोगतात मोदी सरकारवर टीका केली. मोर्च्याला शहराध्यक्ष किशोर बारावकर, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रवीण ब्राह्मणे, युवा सेनेचे सुमित पाटील, संदीप पाटील, भूषण पाटील, संदीप जैन , जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत यांच्यासह स्थानिक महिला पदाधिकारी मंदाकिनी पाटील, किरण पाटील, बेबा पाटील, सुशिला पाटील, जया पवार, सुष्मा पाटील, सुरेखा वाघ (भडगाव), उर्मिला शेळके सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.







