जळगाव – येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागात डॉ. विलास चव्हाण यांची सेवा उपलब्ध झाली आहे.
मानसोपचार तज्ञ डॉ. विलास चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून एम बी बी एस तर डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन, रांची विद्यापीठ येथून पूर्ण केले आहे. याच बरोबर मसिना हॉस्पिटल मुंबई येथून डी एन बी हा अभ्यासक्रम नवी दिल्ली येथील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामीनेशनद्वारे पूर्ण केला आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे मानसोपचार विभाग, मसिना हॉस्पिटल मुंबई येथे जेष्ठ मानसोपचार तज्ञ, झारखंड रांची येथील सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ सायकॅट्रि येथे सेवा दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील ते रहिवासी आहेत.
या आजारांवर होणार उपचार =अर्धशिशी – डोकेदुखी – नैराश्य- अपस्मार (मिर्गी) – झोपेचे आजार -लठ्ठपणा – व्यसमुक्ती- स्क्रीजोफेनिया – उदासिनता – चिंता-तणाव यासारख्याआजारांचे निदान करुन औषधोपचार तसेच समुपदेशन डॉ. चव्हाण करणार असून सोमवार, ते शनिवार दरम्यान सकाळी 9 ते 5 यावेळेत या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







