जळगाव प्रतिनिधी ;- दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत विधी अधिकारी जागीच ठार झाले असून पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. बांभोरी जवळ हे दोन्ही जण पारोळा येथे कामानिमित्त जात असतांना हा अपघात घडला.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे दुर्गादासगिरी गोसावी आणि शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत संदीप भीकन पाटील हे आज सकाळी दुचाकीने जळगावहून पारोळ्याकडे कामानिमित्त जात होते.
बांभोरी जवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुर्गादासगिरी गोसावी ( रा. पाचोरा) हे जागीच ठार झाले असून संदीप भीकन पाटील ( रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, या दोन्ही पोलीस कर्मचार्यांच्या दुचाकीला धडक देणार्या वाहन चालकाने घटनास्थळाहून वाहनासह पलायन केले असून आता त्याचा शोध घेतला जात आहे.







