जळगाव :- पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन हे गेल्या चार वर्षापासून ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जळगाव या पदावर कार्यरत होते. संपटनेसाठी केलेल्या कार्यांची दखल घेत भूषण महाजन यांची पदोभ्रती म्हणून खान्देश विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संपाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्यासह संपटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








