नवी दिल्ली वृत्तसंस्था ) केंद्राच्या वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या ६ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी अजूनही अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, दिल्लीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वायुसेना भवन जवळ दिल्ली पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन शेतकऱ्यांना अटक केली. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून तिघेही ओपन जिप्सीमध्ये जात होते. चौकशीनंतर लॉकडाऊनच्या उल्लंघनाच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना जामीनावर सोडण्यात आले.