जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका नामांकित महिला डॉक्टरला एका ओळखीच्या महिलेच्या सांगण्यावरून काही गुंडांनी जिवे मारण्याची धमकी देत तिला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव येथील महिला डॉक्टरच्या परिचित असलेल्या अंजोली नारखेडे यांनी स्वतःच्या गैरफायद्यासाठी महिला डॉक्टरची बदनामी केली. फिर्यादी महिला डॉक्टर यांनी बदनामी बाबत दाखल केलेल्या फिर्यादीचा राग धरला. त्या डॉक्टर फुले मार्केटजवळ स्कूटी गाडीवर त्यांचे मुलीचे सोबत असताना आरोपी अंजोली नारखेडे हिच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी अश्लील व लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारची शिवीगाळ करत ‘अंजोलीच्या कोर्ट मॅटरमध्ये पडू नको, अन्यथा अश्लील व्हिडीओ करू, अंगावर गाडी घालून तुला जीवे मारून टाकू’ अशी धमकी देत उभ्या स्कूटीला लाथ मारून मुलीस खाली पाडण्याचा प्रयत्न केला.
प्रकरणी दि. २४ रोजी शहर पोलीस स्टेशन येथे अंजोली नारखेडे व इतर शिवीगाळ करून बदनामी करणाऱ्या व्यक्तींचे विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहे, असे नामांकित महिला डॉक्टर यांचे वकील ॲड. अतुल द. सुर्यवंशी यांनी कळवले आहे..
नामांकीत महिला डॉक्टरला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे शहरात व वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपींचा त्वरित बंदोबस्त व्हावा अशी वैद्यकीय क्षेत्रातून मागणी होत आहे.