चाळीसगाव (प्रतिनिधी) – नवीन दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतिसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आला आहे.
चाळीसगाव येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेला नवीन दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून सदर विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर दवाखाना बांधण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून पैसे देऊन ये असे सांगून छळवणूक करण्यात आली. त्याचबरोबर पैसे देऊन ये अन्यथा दुसरा विवाह करून घेईल अशी धमकी पती निखील प्रमोद कोठावदे यांच्याकडून देण्यात आली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ४९८ (ए), ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे पती निखील प्रमोद कोठावदे, सासु उज्ज्वला प्रमोद कोठावदे, सासरे प्रमोद गोविंदा कोठावदे, नणंद जागृती प्रमोद कोठावदे व नणंद पियुष प्रमोद कोठावदे सर्व रा. गुजरगल्ली जि. नंदुरबार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.