जळगाव तालुक्यातील शिरसोली येथिल घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावाजवळ असलेल्या सुईबर्डी शिवारात एका शेतामध्ये शेतमालकाने तरुण विवाहितेला मदत करण्याचे बहाण्याने बोलावून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरी बारी (रा. शिरसोली ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सदर विवाहित महिला ही शुक्रवारी दुपारी २ वाजता बकऱ्या चारण्यासाठी सुईबर्डी शिवारातून जात असताना हरी बारी याच्या शेताजवळून जात होती.
तेव्हा शेतामध्ये फवारणीच्या पंपाच्या कामासाठी हरी बारी याने विवाहितेला बोलावले. तेथे पंपाचे काम करत असताना त्याने विवाहित महिलेशी आगलट करुन विनयभंग केला. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शनिवारी रात्री विवाहितेच्या फिर्यादीवरून हरी बारी यांचेविरुद्ध एमआयडीसी पोलीसात ॲट्रॉसिटी व विनयभंग याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे हे करीत आहेत.









