चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी, मुद्देमाल जप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील करगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरात हत्यारे बाळगून असलेल्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ही हत्यारे त्यांनी विकत घेतली त्या पुणे येथील संशयिताला देखील अटक करण्यात आले आहे. हा संशयित पुणे येथील कोयत्या गॅंगचा सदस्य आहे.
चाळीसगाव शहरात हद्दितील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन संशयित ऋषिकेश ऊर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटु पाटील रा. श्रीकृष्ण नगर, करगांव रोड, चाळीसगांव त्याच्या राहत्या घरात हत्यारे बाळगत असलेबाबत माहिती मिळाली होती. त्याच्या घरात झडती घेतली असता, एक गावठी पिस्टल, त्यात एक जिवंत काडतुस व चॉपर मिळुन आले.
सदर हत्यारे ही संशयित आरोपी हृषीकेश याने संशयित निखील जगन्नथ शिंदे उर्फ बंडी निक्या रा. लक्ष्मीनगर, येरवड, पुणे व त्याच्या मित्राकडुन २१,५००/- रुपयास विकत घेतल्याची माहिती दिली. हा संशयित निखिल शिंदे उर्फ बंडी आता चाळीसगाव शहरात वास्तव्यास राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यास पळुन जाण्याची संधी न देता अटक करण्यात आली.
निखील जगन्नथ शिंदे उर्फ बंडी सराईत गुन्हेगार असुन तो येरवाडा, पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे. सदर कोयता गँग मधील सदस्यांनी दि. २५ रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर , येरवडा, पुणे या भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे ३० ते ३५ वाहनांच्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केली होती. येरवडा पो.स्टे. येथे गुन्हा नोंद असुन, त्यात सदर गुन्हयात गुन्हा घडल्यापासुन निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता.
सदर आरोपीतांविरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे.ला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास PSI योगेश माळी व कल्पेश पगारे करीत आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, उपनि योगेश माळी, पोना दिपक पाटील, पोकॉ. अमोल भोसले, पोकॉ विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील पोना निलेश पाटील, नंदकिशोर महाजन, मनोज चव्हाण, मपोहेकॉ विमल सानप अशा पथकाने कामगीरी केली.