चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीतांना ताब्यात घेवुन त्याचेकडुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने ३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
फिर्यादी नानासाहेब सुदाम आहेर (रा. जळगाव खु॥ ता. नांदगाव जि. नाशिक) यांची ७० हजार रुपये किं.ची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटीना मोटर सायकल क्रं. एमएच बिजी -६९४१ ही चाळीसगाव शहरातून घाट रोड विठ्ठल सभा मंगल कार्यालयजवळुन रविवारी दिनांक १६ जून रोजी चोरीस गेली होती. फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन केले होते. अज्ञात आरोपीतांचा चाळीसगाव शहरातील घाट रोड बायपास परीसरात शोध घेतला असता ते मिळुन आले. संशयित आरोपी सुनिल रघुनाथ मेंघाळ (वय- २२ वर्षे), तुळशिराम मच्छिंद्र जाधव (वय- १९ वर्षे), कचरु शिवा मेंघाळ (वय- १९ वर्षे), व १७ वर्षीय बालक (सर्व रा. कोळवाडी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व इतर दोन मोटार सायकली असे एकुण १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या एकुण ३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई ही महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव, अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, गुन्हे शोध पथकातील पोउपनिरी सुहास आव्हाड, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोक रविंद्र बच्छे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ मनोज चव्हाण, पोक राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.