अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरात ट्रकने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजी ७:४५ वाजता घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत मोतीराम पाटील (वय ५०, रा. सद्गुरूनगर, ढेकू रोड) हे त्यांची मोटरसायकल क्रमांक (एम एच १९, डिव्ही १२२४) ने त्यांच्या मुलीला प्रताप कॉलेजला सोडून परत येत असताना भद्रा प्रतीक मॉल जवळ ट्रक क्रमांक (एम एच १८ बी झेड २८८७) हिच्या चालकाने भरधाव वेगाने चालवत जबर धडक दिली. चंद्रकांत पाटील हे खाली पडल्याने डावा पाय फॅक्चर झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीचे भाऊ नंदकुमार मोतीराम पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रक चालकविरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.