मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्याजवळ घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर ते ब-हाणपूर रोडवरील नायगाव फाट्याजवळ एका कंटेनरने वृद्ध मोटरसायकलस्वाराला धडक दिली. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यावर कंटेनर चालक फरार झाला.
रघुनाथ नाना पाटील (वय ७० वर्षे, रा. पिंपरी पंचम ता. मुक्ताईनगर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील भगवान तुकाराम चौधरी (वय ५२ वर्ष) यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी पंचम येथील रघुनाथ नाना पाटील (वय ७० वर्षे) हे त्यांच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ बी. एफ.६८३) या वाहनाने जात होता. सदर वाहनाला कंटेनर क्रमांक (एचआर ३८ एडी ५१०९) या वाहनाने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीला जोराने धडक दिली. त्यात रघुनाथ नाना पाटील हे ठार झाले. घटना घडल्यावर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला. दरम्यान या संदर्भात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.