जळगाव एलसीबीची मेहरुण परिसरात कारवाई
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील मेहरुण भिलाटी परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने आज ताब्यात घेतले. विशाल संजय पवार (रा. भिलाटी मेहरूण, जळगाव) असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल मॅक्झीनसह जप्त करण्यात आला आहे. मंगळवार, २७ मे २०२५ रोजी एलसीबीला विशाल पवार हा मेहरुण भिलाटीजवळ पाण्याच्या हौदाजवळ गावठी कट्टा बाळगून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत विशाल संजय पवार याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ लोखंडी गावठी पिस्तूल मॅक्झीनसह मिळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे विशाल पवार विरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. निरीक्षक शरद बागल, सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेखा, प्रविण भालेराव, किशोर पाटील, प्रदीप चवरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.