जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील सुमित्रा शालिग्राम चौधरी (वय-६५) या वृद्ध महिला कामाच्या निमित्ताने चोपडा येथे आल्या होत्या. काम आटोपून सोमवारी दि. १७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता चोपडा बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर वृद्ध महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी करत आहेत.