यावल तालुक्यातील बर्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावरील घटना
यावल (प्रतिनिधी) – येथील बर्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर यावल शहरापासून दोन किलोमिटरवरील महाजन पेट्रोल पंपाजवळ एसटी व दुचाकींचा भिषण अपघात झाला आहे. यात एक तरुण जागीच मरण पावला आहे. तर तिन जण गंभीर जखमी झाले आहे.यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुर्हाणपुर-अंकलेश्वर राज्य मार्गावर दि.१२ जुन रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास यावल डेपोची बस यावलहून क्रमांक (एमएच १४ बिटी २१४४) वरील वाहनचालक राजेन्द्र सोनवणे हे चाळीसगाव येथे घेऊन चालले होते. त्यावेळी बस आणि दुचाकी क्र. (एम पी ०९ क्युटी ३९३९) या वाहनांचा भिषण अपघात झाला. यात दयाराम बारेला (वय १९, रा. जामुनझीरा ता. यावल) हा ठार तर मांगीलाल कोशा बारेला (वय २८), सुनिता मांगीलाल बारेला (वय २५) आणी पिंकी बारेला (वय ३, सर्व रा. शिरवेल जवळ खापर,जामली येथील रहिवासी (मध्य प्रदेश) हे जखमी झाले आहेत.
दरम्यान जखमींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी उपचार केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.