अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुलजवळ बस व दुचाकीचा भीषण अपघातात झाला. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
मृत महिलेचे नाव अरुणाबाई समाधान राजपूत (वय ४९, रा. खडके ता. अमळनेर) असे आहे. त्या पती समाधान रुपसिंग राजपूत यांच्यासोबत दुचाकीने अमळनेरकडून खडके येथे जात असताना समोरून येणाऱ्या कल्याण-रावेर बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अरुणा राजपूत या जागीच ठार झाल्या. समाधान राजपूत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी व पोलिसात धाव घेतली. चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.