पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थांनी विविध कलागुण सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हातिम लाकडावाला, सेक्रेटरी-मोहम्मद बोहरी, चेअरमन- ताहेर कपासी ,व्हाईस चेअरमन- मुस्तफा लाकडावाला, चेअरमन न्यू बुऱ्हानी- मुस्तफा भडगाववाला ,व्हाईस चेअरमन न्यू बुऱ्हानी – मुनावर बदामी, अब्बासभाई कपाशी, मुर्तजाभाई बदामी, हूजेफाभाई लोखंडवाला, मुफद्द्लभाई चित्तलवाला, उपनिरीक्षक श्री योगेश गणगे साहेब, बी.एन.पाटील सर, श्रीमती भगवती राऊत, मच्छिंद्र जाधव, किशोरभाऊ डोंगरे , माजी नगरसेवक बंडूभाऊ चौधरी, श्रीकांतभाऊ गायकवाड – पोलिस , मोसिन खाटीक (चेअरमन चेतना इंग्लिश स्कूल भडगाव ), उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्या .मनीषा दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन अश्विनी सोमपूरकर, अस्मिता पाटील व विद्यार्थांनी केले, याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या मनीषा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकाच्या हातात विद्यार्थ्यांचे भविष्य आहे, विविध कलागुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. व शिक्षकांनी मनापासून कार्य करावे व विद्यार्थी घडवावे असे आवाहन केले, यावेळी शाळेच्या प्लेग्रुप पासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली, यात वैयक्तिक नृत्य ,समूह नृत्य , गायन , नाटिका या कार्यक्रमांचा समावेश होता या कार्यक्रमात जवळपास 520 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यावेळी प्रेक्षकानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली, तसेच प्रेक्षकानी कार्यक्रमाचा आस्वाद घेत विद्यार्थांना रोख बक्षीस देवून उस्ताह वाढविला, बी एन पाटील प्रशासक यांनी उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या , सर्व शिक्षक,शिक्षिका – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.