बुलढाणा तालुक्यातील घटना
बुलढाणा (प्रतिनिधी) : डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन कॉलेजमध्ये निघालेल्या १९ वर्षीय मुलीचा दुचाकीने दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुलडाण्यात घडली आहे. ॠतूजा सावळे असं अपघातात निधन झालेल्या मुलीचं नाव आहे. ती डोंगरशेवली गावातील होती. मंगळवारी कॉलेजला जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्याचवेळी डोके बसला धडकले अन् ती खाली कोसळली. उपचारासाठी तिला तात्काळ रूग्णालयात दाखळ केले. पण डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले.
अपघाताची ही घटना बुलडाण्यातील डोंगरशेवली गावाजवळ घडली. ती बुलडाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळी ॠतूजा सावळे(वय १९ वर्ष, रा. डोंगरशेवली) हि महाविद्यालयाला जात होती. त्यावेळी समोरून येणार्या दुचाकीने जोरात धडक दिली. त्यावेळी एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले अन् ती खाली कोसळली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी अपघातानंतर तात्काळ धाव घेतली अन् ॠतूजाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ॠतूजाला मृत घोषीत केले. यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे.









