बुलडाणा जिल्ह्यातील राजमातांच्या सिंदखेडराजा तालुक्यातील घटना
बुलढाणा (प्रतिनिधी) : सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हापरिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घटनेत ५६ वर्षीय शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे.
खुशालराव शेषराव उगले असं आरोपी शिक्षकाच नाव आहे. नुकतेच बदलापूरची आणि अकोल्यातील घटना ताजी असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना पुढे आली आहे. जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात घडलेल्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्या नराधम शिक्षकाविरोधात किनगावराजा पोलीस स्टेशनला पोस्को व अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसाचं एक पथक रवाना करण्यात आले आहे.