चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिंदी येथे 16 वर्षीय मुलाचा शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. संतोष सुनील रावते असे मृत बालकाचे नाव आहे. तो गुरे चारण्यासाठी गेला होता. संतोष रावते शेततळ्यात पाय घसरून पडला. ही घटना उघड होताच त्याला काशिनाथ सोनवणे यांनी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परीवार आहे. हवालदार दीपक ठाकूर हे तपास करत आहेत.