जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना
जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथे वाकी नदीजवळ असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पिंटू बुधा पवार (वय २८, रा. चिंचोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंटू पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.पिंटू पवार हे शेतमजूर म्हणून काम करत होते. (केसीएन)रविवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते चिंचोली गावाजवळ असलेल्या वाकी नदीच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते तलावाच्या खोल पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांच्या बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. काही पोहणाऱ्या तरुणांनी त्यांना बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषित केले. या घटनेमुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.