चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील आदित्य नगर जवळील पाटाच्या चारीतील पाण्यात बुडून शिवराम देवसिंग बारेला (वय ३५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.३ रोजी घडली.

मध्य प्रदेशातील चाचऱ्या ता.सेंदवा येथील रहिवासी शिवराम बारेला हे चोपडा तालुक्यातील धनवाडी येथे राहत होते. त्यांचा शहरातील धनवाडी रस्त्यालगतच्या पाटचारीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयत स्थितीत बारेला याला नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.चंद्रहास पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. श्रीराम पाटील हे करीत आहेत.







