चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील दुर्घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) — तितूर नदीत पोहण्यासाठी गेलेली तालुक्यातील वाघळी येथिल रहिवाशी १४ ते १६ वर्षे वयोगटातील दोन सख्खे भाऊ पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना आज घडली. पोलीस पाटलांनी पोलीस आणि तहसिलदारांना माहिती दिल्यावर तहसीलदार अमोल मोरे घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात आले.
वाघळी गावालगत तितुर नदीपात्रात कमळेश्वर के. टी. वेअरजवळ आज ही घटना घडली. नदीत बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये साहिल शहा शरीफ शहा फकीर (वय १ ४ ) व आयान शहा शरीफ शहा फकीर (वय १ ६ ) अशी या दोन भावांची नावे आहेत. नदीत पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. यातून त्यांना बाहेर निघता आले नाही. यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आयानचा मृतदेह मिळून आला. साहिल अद्यापही बेपत्ता असून उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
गणपती विसर्जन व या घटनेचा काही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे . घटनास्थळी आमदार मंगेश चव्हाण , तहसीलदार अमोल मोरे , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोहचले आहेत पट्टीच्या पोहणारीच्या मदतीने पोलिसांचे पथक दुसरा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी या कुटुंबियांचे सांत्वन केले या दोन भावांच्या पश्चात आई – वडील , एक विवाहित आणि दुसरी अविवाहित बहीण आहे या घटनेसंदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे या मुलांचे पालक मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नातेवाईकांकडून सांगण्यात आले की, दोघेही भाऊ हे तितूर नदीवर गणपती विसर्जनासाठी गेले होते.