जळगाव ( प्रतिनिधी )— तालुक्यातील लमांजन येथील वृद्धेचा आज सकाळी गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

लमांजन येथील हिराबाई पाटील ( वय ६८) या पातर्विधीसाठी गिरणा नदीच्या काठावर गेल्या होत्या . नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून त्या नदीतील डोहात पडल्या. असाव्यात असे सांगण्यात येत आहे. सकाळी ५ वाजता गेलेल्या हिराबाई पाटील ७ वाजून गेले तरी न आल्याने त्यांचा पुतण्या गोरख पाटील त्यांना शोधण्यासाठी गेल्यावर त्याला नदी काठावर त्यांची बदली आणि चष्मा पडलेला दिसला त्यानंतर ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी २ तास शोधाशोध केल्यावर एका काटेरी झुडुपात अडकलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.
नदीपात्रातून हिराबाई पाटील यांचा मृतदेह काढताना पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांचा मृतदेह जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सायंकाळी ५ वाजता हिराबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत हिराबाई पाटील यांच्या पश्चात १ मुलगा , सून , नातवंडे , पुतणे असा परिवार आहे .







