बी आर एस पक्षात जम्बो इनकमिंग
शिरसोलीतील तरुणांनी प्रस्थापितांना झिडकारले
जळगाव (प्रतिनिधी) – बी आर एस पक्षात आता जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे जम्बो इनकमिंग सुरु झाले असून आज शिरसोलीतील ८० तरुणांनी प्रस्थापितांना झिडकारत भारत राष्ट्रीय समिती अर्थात बी आर एस पक्षात प्रवेश केला आहे .पद्मालय विश्रामगृहाच्या प्रांगणात हा प्रवेश सोहळा पार
पडला .
यांनी घेतला प्रवेश
बाळकृष्ण (नाना) हवालदार , नामदेव चावदास पाटील, अमजद पिंजारी, कुणाल मुरलीधर बारी, संतोष महाजन, विजय सोनू पवार , विनोद लक्ष्मण मोरे , प्रकाश पवार , दीपक सोनवणे, भरत पाटील ,, विठ्ठल संतोष पाटील, शुभम राजेंद्र बाविस्कर (सोनार), विशाल मोरे, प्रेम सावळे, चेतन बंडू सोनार, निवृत्ती ज्ञानेश्वर माळी, गजानन मराठे, चवदास काशिनाथ नेटके, विनोद खर्चे , आत्माराम सोनार, निलेश पाटील, रोहिदास भोई,दीपक पाटील, अजय चौधरी, बंटी पाटील ,चंदु रामकृष्ण माळी, भरत हटकर , पवन राजपूत ,रामू राजपूत, सनी धनगर ,भूषण पाटील, भास्कर माळी , रामभाऊ खोंडे (न्हावी) ,शंकर ताडे , रमेश पाटील , भास्कर फुसे ,अजय मोरे ,गोपाल मोरे, भरत सोनवणे, प्रमोद पवार , विजय मोरे ,नवल सोनवणे , जितेंद्र वाघ , आप्पा सोनवणे , प्रविण सोनवणे , दीपक मोरे ,रोहिदास सोनवणे यांच्यासह ६० कार्यकर्त्यांचा समावेश होता.
भारत राष्ट्रीय समिती अर्थात बी आर एस पक्षात आज बी आर एस चे समन्वयक आणि जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ( लकी टेलर ) यांच्या उपस्थितीत प्रवेश करणाऱ्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने राजकीय विश्लेषकांच्या आतापासूनच भुवया उंचावल्या आहेत . या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किल्ल्याला खिंडार पडले आहे. यापुढे आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बी आर एस पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस पक्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होत असल्याने इतर राजकीय पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यानंतरही असेच पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक यांना टेलर यांनी केला आहे.