नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करु शकले नाहीत. मात्र रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाने शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. यावेळी सिनेमाचे 13000 पेक्षा जास्त शो सिनेमा हॉलमध्ये चालले. या सिनेमाने ऑनलाईन शोसाठी अॅडव्हान्स बुकींग 19.66कोटी रुपयाचे केले होते. ‘ब्रह्मास्त्र’चा बॉक्स ऑफिसवरचा आकडा पाहून ज्यांनी या सिनेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्यांना तोंडात बोट घालायची वेळ आली आहे. रिपोर्टेनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर 36 कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदी व्हर्जनमध्ये 32 कोटींची कमाई केली आहे.