जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शिव कॉलनी भागाच्या पुढे खंडेराव नगरजवळ बोगद्याच्या खाली एका प्रौढाचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज माणिकराव देशमुख (वय ४८, रा. आशाबाबा नगर, जळगाव) असे मयत प्रौढ इसमाचे नाव आहे. ते दोन भाऊ, बहिणींसह राहत होते. काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे हे घरीच राहत होते. मंगळवार दि. २६ रोजी सकाळी ७ वाजेनंतर ते खंडेराव नगर बोगद्याकडील भागात गेले होते.(केसीएन)दरम्यान काही वेळानंतर त्यांचा मृतदेह बोगदाजवळ आढळला. नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना फोन करून बोलावले.
पुलावरून चालत असताना खाली पडून मनोज देशमुख यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. मनोज देशमुख यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.