बोदवड तालुक्यात साळशिंगी येथील घटना
बोदवड ( प्रतिनिधी ) – तालुकयातील साळशिंगी गावात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी समाधान पोपट पाटील (वय ६२, रा. साळशिंगी, ता. बोदवड) हे शेती करतात. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील मौल्यवान दागिने घेऊन पोबारा केला.चोरट्यांनी एकूण १,९०,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या प्रकरणी समाधान पाटील यांनी २३ फेब्रुवारी रोजी बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राहटे करीत आहे.






