बोदवड ( प्रतिनिधी ) – जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, जळगाव अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, बोदवड येथे भव्य मानसिक आरोग्य शिबीर संपन्न झाले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भडगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री.राहुल गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज चौधरी,निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ.सुशांत सुपे,वैद्यकीय अधिकारी वर्ग – 1वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गिरी, डॉ.अमोल पाटील, तज्ञ मार्गदर्शक डॉ. उदय पाटील, डॉ.सुनील बन्सी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.किरण सोनटक्के,NCD कॉडीनेटर डॉ.स्वप्नजा तायडे यांची उपस्थिती होती.
बोदवडचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांनी मानसिक आजाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक आजारावर वेळीच औषध उपचार केल्याने हा आजार नियंत्रनात राहतो व बरा होतो या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शिबिराचे मुख्य मार्गदर्शक डॉ.उदय पाटील यांनी मानसिक आजार झपाट्याने वाढत आहे याची असंख्य कारणे आहेत जसे कोरोना महामारी,कौटुंबिक कलह,अतिवृष्टी,व्यसनाधीनता, अश्या अनेक कारणांमुळे मानसिक आजार होत आहे त्यावर उपचार घेणे खूप गरजेचे आहे. मानसिक आजार इतर आजारा प्रमाणे बरा होऊ शकतो. मानसिक आजारावर वेळेत औषधोपचार व समुपदेशन हीच गुरुकिल्ली आहेत ह्या बाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन नारखेडे यांनी जिल्हा मानसिक कार्यक्रम बाबत माहिती दिली.शिबिराचे सूत्रसंचालन मानसतज्ञ दौलत निमसे यांनी केले. मान्यवरांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गिरी यांनी मानले. शिबिरात एकूण 138 रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 83 रुणांना औषध उपचार देण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी आत्मसन्मान फौंडेशन,बोदवड, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल पाटील, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमातील कार्यक्रम अधिकारी, डॉ.कांचन नारखेडे, मानसतज्ञ दौलत निमसे, मनो.सा.कार्यकर्त्या ज्योती पाटील, मनो.वि.परिचारक विनोद गडकर, प्रोग्राम असिस्टंट मिलीद बरहाटे, चंद्रकांत ठाकूर, तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय, बोदवड येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.