आ. खडसेंचे नेतृत्व यशस्वी ; आ. चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाचा पराभव
बोदवड (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पैनलने विजय मिळवला आहे. भाजप शिंदे गटाला केवळ १ जागा मिळाल्या असून शिंदे गटाला पाठींबा असलेले अपक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवारांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघामध्ये सुधीर रामदास तराळ, अंकुश राजेंद्र चौधरी, राजेंद्र सोनू फिरके, ज्ञानेश्वर अशोक पाटील, आसाराम नामदेव काजळे, किशोर वसंत भंगाळे, योगेश आत्माराम पाटील, महीला राखीव मतदार संघामध्ये आशाबाई भागवत टिकारे, जिजाबाई प्रविण कांडेलकर, इतर मागास वर्ग मतदार संघमध्ये ईश्वर शंकरराव रहाणे, भटके विमुक्त जाती जमातीमध्ये विजय भावराव पाटील, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघामध्ये रामभाऊ शंकर पाटील, दत्ता गणेश पाटील, आर्थिक दुर्बल घटकमध्ये गणेश सिताराम पाटील, व्यापारी मतदार संघ माणकचंद खुपचंद अग्रवाल,अनिल मधुकर चौधरी हे विजयी झाले.
ग्रामपंचायत मतदार संघ:अनुसुचित जाती जमाती राखीवमध्ये जयपाल बोदडे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे.