भडगाव;- तालुक्यातील बोदर्डे येथील भिकन पुंजू नाईक यांच्या घरात दुपारी बारा वाजता चुलीवर स्वयंपाक करत असताना अचानक आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले घरातील टीव्ही पंखा कुलर धान्य डाळी सह पांघरून जळून गेले जळून राख झालेला संसार पाहून भिकन नाईक यांचे अश्रू अनावर युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन कुटुंबाची भेट घेतले जळालेला संसार पाहून अमोल भाऊ शिंदे यांनी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले असून ५ हजार रोख रक्कम दिले गावातील काही तरुणांना माहिती मिळतात पाण्याचे टॅंकर आणून आग विझवली . गावातील तरुणांनी जीवाची परवा न करता घरातून गॅस सिलेंडर बाहेर फेकला गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सह गावातील तरुण मदतीस धावून आले आगीमुळे भिकन नाईक यांचा संसार उघड्यावरआला आहे.








