ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रवेश
जळगाव प्रतिनिधी : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार महत्त्वाच्या संचालकांनी रविवारी नाशिक येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. या प्रवेशामुळे बाजार समितीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजपचे आता स्पष्ट बहुमत झाले आहे.



या चार संचालकांच्या प्रवेशामुळे बाजार समितीमधील भाजपच्या संचालकांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील, तथा (लकी टेलर) माजी उपसभापती राजू पाटील, संदीप पाटील आणि दिलीप पाटील यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी बाजार समितीचे विद्यमान सभापती सुनील महाजन देखील उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे जळगाव बाजार समितीवर आता भाजपची पकड मजबूत झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आता जळगाव ग्रामीण मध्ये भाजपचे वर्चस्व दिसून येणार आहे.










