भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
पाचोरा ( प्रतिनिधी ) – ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळाले असून सर्वाधिक जागा मिळवत भाजपाने पाचोरा तालुक्यात आपली ताकद सिद्ध केली आहे.
निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांसह कार्यकर्त्यांनी पाचोरा येथील अटल भाजपा कार्यालयात जल्लोष केला. यामध्ये भाजपा १८ पैकी १० जागा जिंकुन तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देऊन या निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे यांनी सर्व सदस्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या आगामी निवडणुकीत पाचोरा तालुक्यात भाजपाच १ नंबरचा पक्ष ठरेल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.