प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील : भाजपने अखेर ज्येष्ठ, निष्ठावंतांना दिले झुकते माप
नाशिक (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीत ४६ पैकी ४६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने आज आपल्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज, बुधवार २१ जानेवारी रोजी ही नोंदणी करण्यात आली. यामध्ये भाजप गटनेतेपदी प्रकाश रावलमल बालानी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


भाजपने आपल्या निवडीमध्ये अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना झुकते माप दिले आहे. पक्षाने जाहीर केलेली निवडमध्ये गटनेता प्रकाश रावलमल बालानी, उपगटनेता नितीन बरडे, प्रतोद : डॉ. चंद्रशेखर पाटील यांना संधी देण्यात आली. निवडणुकीत शंभर टक्के यश मिळवल्यानंतर भाजप कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गटनेते निवडीत निष्ठावंतांना प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गटनेते, उपगटनेते आणि प्रतोद पदाच्या या निवडीमुळे आता आगामी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीमध्येही ‘निष्ठावंतांना’च संधी मिळणार, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी झाल्याने आता महानगरपालिकेतील पुढील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.









