जळगाव ( प्रतिनिधी )जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर जे आरोप केले असून हे बिनबुडाचे
व निरर्थक असल्याचेम हानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील आणि नगरसेवक कैलास सोनवणे आदींनी आज भाजपच्या वसंत स्मृती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला .
जळगाव महानगरपालिकेत गेल्या ३५ वर्षापासून खान्देश विकास आघाडी व शिवसेनेची सत्ता होती हे पालकमंत्र्यांना माहित असावे,जळगाव मनपावर असलेले ४.५० कोटींचे कर्ज केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी केलेल्या प्रयत्नांनी मनपा कर्जमुक्त झाली. हे यांना माहित नाही का ? असा सवाल दीपक सूर्यवंशी यांनी विचारला.
*गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकासकामे मार्गी लागली -कैलास सोनवणे*
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत योजना, एलईडी पथदिवे, शिवाजी नगर उड्डाण पूल आदी विकासकामे मार्गीय लागली असल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले.
*४ वर्षात विकासकामे करून दाखवा -राजेंद्र घुगे पाटील यांचे आव्हान*
मनपासाठी १०० कोटी निधी मंजूर झालेल्या कामातून ४१ कोटी निविदा निघाल्या होत्या व त्याला शासकीय मंजुरी मिळाली असताना सुद्धा हे काम कोणी
थांबविले असा सवाल स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी व्यक्त करून आता पावसाळ्याच्या तोंडावर ६१ कोटींचा निधी कसा मंजूर केला . गिरीश महाजन यांनी उड्डाण पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. गिरीशभाऊंनी जेवढे कामे केली तेवढी कामे तुम्ही ४ वर्षात करून दाखवा असा टोला राजेंद्र घुगे पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला .