अखेर तणाव निवळला
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंगळवारी तासा तासाला रंगत वाढत आहे. महायुतीमध्ये आता अंतिम आकडेवारी जुळली असून तासाभरात याची घोषणा केली जाणार आहे.

हॉटेल रॉयल पॅलेस येथे भारतीय जनता पक्षातर्फे आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. यात भारतीय जनता पक्षाला ५० शिवसेनेला १९, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ६ जागा सोडण्यात आले आहेत. त्यानुसार एबी फॉर्म देखील तयार झालेले असून शिवसेनेतर्फे एबी फॉर्म जमा करण्यात आलेले आहेत.

महायुतीच्या फॉर्मुल्याबाबत लवकरच तासाभराने घोषणा केली जाणार असल्याची माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळाले ते देखील थोड्याच वेळात कळणार आहे. तसेच तासाभराने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे ३ वाजेला एबी फॉर्म महापालिकेत जमा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.









