प्रभाग क्रमांक 16 येथे भाजपला धक्का लागण्याची स्थिती


अपक्ष उमेदवारांचा जोर, पहिल्या फेरी अखेरस्थिती
जळगाव विशेष प्रतिनिधी
येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता मतमोजणीला प्रारंभ झाला आहे मतमोजणी मध्ये माध्यम प्रतिनिधींना येण्यास बंदी असली तरी अधिकाऱ्यांकडून काही अंशी सहकार्य मिळत असल्याचे दिसत आहे. प्रभाग क्रमांक १६ ची पहिली फेरी जाहीर झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये विश्वनाथ सुरेश खडके हे बिनविरोध निवडून आलेले आहेत तर प्रभाग क्रमांक १६ ब मध्ये वंदना इंगळे यांना १२८० तर हर्षाली कोल्हे यांना १२०२ मत मिळाले आहेत.
१६ क मध्ये अपक्ष इच्छा अत्तरदे यांना 1507 तर रंजना वानखेडे यांना 846 मध्ये आहेत अंजू निंबाळकर यांना 34, मयुरी चौथे यांना तर मीनल मावळे यांना २८ मध्ये पडले आहेत १६ ड मध्ये भाजपचे सुनील खडके यांना २२९५ तर ललित शर्मा यांना १५२ मते आहेत अमोल चौधरी यांना ४६ मध्ये तर नोटा ला ८९ मध्ये आहेत पहिल्या फेरी अखेर भाजप काहीसा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.








