महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन
पारोळा (प्रतिनिधी) : येथील महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे हे प्रचाराच्या मैदानात कार्यकर्त्यांसह उतरले आहे. गावागावात जाऊन गोविंद शिरोळे हे पारोळा तालुक्यात विविध गावात जाऊन ग्रामस्थांना महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करीत आहे.
महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील हे आ. चिमणराव पाटील यांचा विकासकामांचा वारसा पुढे नेणार असून त्यासाठी भरभरून आशीर्वाद द्यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे करीत आहेत. त्यांच्यासह विविध गावचे कार्यकर्ते सहभागी होत आहे. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक योजना आणून जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम केले. हिच विकास कामांची परंपरा पुढे नेण्यासाठी आता पुन्हा महायुतीची सत्ता परत आणायला उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना निवडून द्या असेही गोविंद शिरोळे सांगत आहेत.