पाटणा (वृत्तसंस्था ) – भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बलात्काराच्या एका प्रकरणात शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या आदेशावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाज हुसेन यांच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप करणाऱ्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यासंबंधीच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.