जळगाव ;- माजी जलसंपदा मंत्री आ गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज १७ मे रोजी वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हा व महानगरतर्फे विविध समाजोपयोगी ,व जनहितार्थ कार्यक्रम राबविण्यात आले यात 5 ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर मशीन चे जळगाव येथील नागरिकांसाठी “निःशुल्क सेवेचा “लोकार्पण” भाजपा कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ येथे जिल्हाध्यक्ष आ सुरेश (राजूमामा) भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आ सुरेश भोळे यांनी सांगितले कि , आ. गिरिश महाजन यांनी सांगितल्या नुसार जाहिरात होल्डिंग पुष्पगुच्छ आदिवर खर्च नकरता कोरोना महामारीत गरजु गरीबांना मदत व सेवा, समर्पण त्याग भावनेने आम्ही आज आरोग्य दाते आ. गिरिश भाऊ महाजन यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेशाम चौधरी, महेश नितीन इंगळे जोशी,प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला ताई बेंडाळे, मनोज भांडारकर, गणेश माळी, धिरज वर्मा शोभा कुलकर्णी,नगरसेवक धीरज सोनवणे, दीपक पाटील, महिला आघाडि अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, रेखाताई वर्मा,प्रमोद वाणी मा पदाधिकारी सुभाष शौचे शिवदास साळुंखे युवा मोर्चाचे अमित साळुंखे,सुभाष साळुंखे गौरव पाटील रोहित सोनवणे, जयंत चव्हाण, प्रथम पाटील, आकाश पाटील, अबोली पाटील, निकिता महाजन,उपस्थित होते तसेच महानगरातिल ९ मंडलात कार्यक्रमआयोजित केले
मंडल क्रमांक-१ मध्ये शिवाजी नगर परिसर येथे ऑकशिजन वड-वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी मंडल अध्यक्ष रमेश जोगी नगरसेवक राजेंद्र मराठे,
रिंग रोड मंडळ-४ शाहू हॉस्पिटल येथे कोरोना योद्धा डॉ राम रावलानी, व इतर (डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ) यांचे शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दीपमाला काळे अॅड सुचीता हाडा, मनोज (पिंटूभाऊ) काळे मंडळ -८ मेहरुनला नागरिकांसाठी ऑटिजेन तपासणी शिबिरसभापती राजेंद घुगे पाटील व मंडल अध्यक्ष विनोद मराठे, आयोजित केले
भा ज पा चित्रपट कामगार आघाडी तर्फे संजय खुंटे भुषण भोळे यांनी कोरोना युद्धांचे सन्मान-पत्र देऊन सत्कार* करण्यात आले. यात जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, चेतनदास हॉस्पिटल,लोकसंघर्ष कोविड सेन्टर ,गोव्हरमेन्ट पोलिटेक्नियक व इतर ठिकाणी जे कोरोना योद्धा म्हणुन काम करत आहे. त्यांचा यावेळी सत्कार केला
ओबीसी आघाडी तर्फे जयेश भावसार, यांनी “पांझरा पोळ गोशाळा”येथे गायीना चारा ,व गौग्रास देण्यात आले
व्यापार आघाडी अध्यक्ष अशोक राठी यांच्या तर्फे २०० हमाल बांधव यांना “मास्क व सॅनिटायझर वाटप” कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले अश्या पद्धतीने सेवा व जन, लोकहितार्थ उपक्रमाणी मा गिरिश भाऊनंचा वाढदिवस साजरा करण्यात आला