भराडी ता जामनेर :- भाजपा महाराष्ट्राचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबवून भराडी येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी सुसज्ज असे वाचनालय भाजपा गण प्रमुख आनंदा जंजाळ यांनी पुस्तक उपलब्ध करून दिली . वाढदिवसा निमित्त दरवर्षी समाजाभिमुख कार्यक्रम राबवून शुभेच्छा देण्याचा आनंदा जंजाळ यांचा मानस असतो. मागील वर्षी लॉक डाऊन काळात निराधार ,विधवा, दिव्यांग नागरिकांना अन्न धान्य किट वितरण केले होते. या वर्षी गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावी या दृष्टीने वाचनालय सुरू करण्यात आल्याचे आनंदा जंजाळ यांनी सांगितले. वाचनालयाचे भाजपा पाळधी गट प्रमुख नाना पाटील यांच्या हातून उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजपा पाळधी गणप्रमुख आनंदा जंजाळ, अजय नाईक, पद्माकर पाटील, शंकर चौधरी , अतुल पाटील, योगेश पाटील, ईश्वर पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.