मुुंबई : राज्यातील विशेषत: मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून निष्क्रिय झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना भेटून निवेदन देणार आहेत, तर २२ मे रोजी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही रोजंदारीवर काम करणा-या मजूर, कामगार व श्रमिकांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे.